Sunday, October 28, 2018

जागतिक ऍनिमेशन दिन विशेष - चलचित्रांद्वारे कथा सांगण्यास सुरुवात

कुठलेही नवीन तंत्रज्ञान हे जगणे सोपे करत असते. टीव्ही, विडिओ आणि फिल्म्स ही अशी प्रसारमाध्यमे आहेत ज्यात खूप साऱ्या कल्पनांची गरज असते आणि जितके तंत्रज्ञान पुढे जाते तेवढे काल्पनिक स्वातंत्र्य वाढत जाते. एनिमेशन मध्ये कलेचा भाग हा जास्त आहे पण कालांतराने तंत्रज्ञानामुळे त्यात जे बदल झालेत ते आश्चर्यकारक असे आहेत. एनिमेशन चा खरा अर्थ म्हणजे 'जिवंत पणाचा भास' निर्माण करणे. हा भास निर्माण झाला तो कलेतूनच. मानवाच्या जिवंत हालचालींचे चित्रण आणि रेखाटन करुन हा जिवंतपणाचा भास निर्माण केला जातो.
                
जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये कठपुतलीचा खेळ बघायला मिळतो. ह्याला मानवी हालचालींचे चित्रण म्हणता येईल. पण इथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मनोरंजन ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती आधीच्या संस्कृतीमध्ये होती. इतिहास हा संपूर्ण काल्पनिक कथांनी भरलेला आहे. एनिमेशन क्षेत्रातील महत्वाचे यश म्हणावे तर ते म्हणजे कुठल्याही कथांना सत्यात उतरवण्याची क्षमता. कथा सांगण्यासाठी अभिनय ही गोष्ट वापरली जाते आणि अभिनय ही सुद्धा एक कला आहे जी त्या कथेला जिवंतपणा आणते. इतिहासात कथा दाखवण्यासाठी भारतातील लेणी आणि मंदिरांमध्ये छान छान प्रसंग हे दगडांमध्ये कोरून दाखवले आहेत. इजिप्तमधील भित्तिचित्रामध्ये देखील असे खूप प्रसंग आहेत. आपण मानवी हालचालींचे असे सूंदर चित्रण कुठेही पाहिले नसतील असे चित्रण त्या कलाकारांनी करुन ठेवले आहेत.
इजिप्त मधील अचूक मानवी हालचालींचे चित्रण
भारतातील मनोरंजक कठपुतळीचा खेळ
                 इतिहासात आधी पुस्तके ही गोष्ट सांगण्याचे मध्यम नव्हते. तेव्हा कविता, गाणे, मुखोद्गत गोष्टी आणि भित्तिचित्रे ही सर्वात योग्य आणि टिकाऊ अशी माध्यमे होती. लिखाणामध्ये पुस्तकांचा वापर फार उशिराने सुरु झाला आणि तोसुद्धा माहिती साठवण्यासाठी. आज लिहिले जाणारे खुप सारे अक्षर आणि लिपीं हे आधी चित्रांच्या स्वरुपात होते. म्हणजे काही प्रसंग लिहिताना एखादी व्यक्ती काय करतेय त्याची हालचाल टिपून एक वाक्य तयार व्हायचे. काही पुस्तके अशी आहेत की ज्यात फक्त चित्रेच आहेत. चित्रांच्या स्वरुपात कथा सांगणे सोपे जाते पण भाषा आणि लिपीमध्ये जास्तीत जास्त माहिती साठवता येते. एनिमेशन हे साहजिकच गोष्ट सांगण्यासाठीचे माध्यम आहे पण कुठलीही अवघड माहिती गोष्टीस्वरुपात सांगूनच योग्य प्रकारे लक्षात राहते आणि सोप्या स्वरुपात इतरांसमोर मांडता येते . ह्याचं उदाहरण म्हणजे योग्य माहिती सांगण्यासाठी आधी लोककथा,अख्यायिकचा मिथकांचा झालेला वापर. नाटक व अभिनय ह्यांच्या पुढे जाऊन कुठले तांत्रिक माध्यम  येत असेल तर ते म्हणजे चित्राद्वारे गोष्टी सांगणे नाहीतर किमान अशी कथा तयार करणे की ज्यामुळे डोळ्यांसमोर लगेचच त्या प्रसंगाचे चित्र उभे राहील. विनोद, चमत्कार आणि भीती ह्यांचा वापर करुन आपोआप आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभे केले जाते. ह्यात मानवाच्या शक्तिशाली कल्पनाशक्तीचा सलाम केला पाहिजे. महत्वाचे हेच की माहिती गोष्टीच्या आधारे आणि गोष्टी चित्रांच्या आधारे सांगणे म्हणजे अवघडाचे सोपे करणे असा प्रवास आहे. ज्या भावना आणि कल्पनांचा अभिनय करणं अवघड आहे त्यांना कला आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सोपे दर्शविणे ही  एक कला आहे. 

ग्रीक झेट्रोपे यंत्र
                  एनिमेशन चा शोध जरी आधुनिक काळात लागला असेल पण त्याचा इतिहास हा फार नैसर्गिक आहे हे वरील विचारांवरुन लक्षात येते. सांगायचेच झाले तर प्राचीन ग्रीक आणि इतर संस्कृतींमध्ये दहाव्या शतकातच 'झेट्रोपे' ह्या गोल आकाराच्या फिरणाऱ्या अशा यंत्राचा शोध लागला होता. ज्यात वेगामुळे आकृती हलण्याचा भास निर्माण व्हायचा.  पण जेव्हा १८व्या शतकात काळ्या फिल्म चा शोध लागला तेव्हा चित्रपट बनण्याआधीच एनिमेशन हे जगात आले होते. २८ ऑक्टोबर १८९२ साली चार्ल्स एमिल रेनॉड ह्याने मानवी चित्रांच्या कात्रणांचा वापर करुन त्यांचे हात पाय हलवून पाहिले एनिमेशन बनविले आणि  तेसुद्धा कुठल्याही फिल्म विना. ते बनवून त्याने लोकांना आश्चर्यचकित केले. ह्याच दिवसाला आज 'जागतिक एनिमेशन दिन' म्हणून जगात साजरा जगभर करतात. त्यानंतर साहजिकच फिल्म मुळे एनिमेशन बनवणे अधिक सोपे झाले. फिल्म वर कलाकुसर करुन एनिमेशन तायार व्हायचे. डिस्नी सारख्या कंपन्यांनी ह्या हलचालींच्या तंत्राचा उत्तम वापर केला आणि ऐतिहासिक ऍनिमेशनपट बनविले ज्यात कथा अगदी छान सांगितल्या जाई. नंतर इतर एनिमेशन स्टुडिओ पण त्या स्पर्धेत उतरले आणि 2D एनिमेशन म्हणजे द्विमितीय एनिमेशन चा काळ सुरू झाला. ह्याच काळात चित्रपटश्रुष्टीही भरभराटीस आली होती. काही चित्रपटांमध्ये काठपुठळ्यांचा वापर करून डायनोसॉर सारखे प्राणी आणि अंतराळ यान दाखवले जात. त्याला स्टॉप मोशन एनिमेशन देखील म्हणतात. कॉम्पुटर चा शोध लागेपर्यंत सर्व काही ठीक चालू होते पण जेव्हा कॉम्प्युटर चा शोध लागला तेव्हा एनिमेशन चे संपुर्ण जग बदलून गेले आणि 3D एनिमेशन उदयास आले. जैविक हालचालींना आता त्रिमितीय आणि खरेखुरे स्वरुप येणार होते. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये आभासी मॉडेल्स चा वापर झाला. हा वापर पहिल्यांदा जर कुणी केला असेल तर तो म्हणजे जॉर्ज लुकास ने स्टार वॉर्स ह्या त्याच्या फिल्म मधे. यानंतर कॉम्पुटर जनरेटेड इमॅजिनरी च्या आधारावर आभासी कटपुतली तयार करून त्याला हालचाल देऊन अनेक छान कथेच्या फिल्म्स बनल्या. पिक्सार ऍनिमेशन स्टुडिओचा सर्वेसर्वा जॉन जॉन लासेटर ह्याने स्वतः दिग्दर्शन करुन 'टॉय स्टोरी' (१९९५) ही पहिली ३D ऍनिमेशन  फिल्म येऊ घातली. जॉर्ज लुकास ह्याने सर्वात आधी कॉम्प्युटर जनरेटेड इमॅजिनरी चा वापर आपल्या स्टार वॉर ह्या चित्रपटामध्ये केला होता आणि त्यानेच पिक्सार ला मदत केली होती. पिक्सार ने 3D एनिमेशन च्या जगात क्रांती केली आणि इतरांना प्रेरणा दिली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या जॉन लासेटर ज्याने पिक्सार ची सुरवात केली तो स्वतः एक 2D एनिमेशन बनवणारा होता. 

२D ऍनिमेशन ची सुरुवात
चार्ल्स -एमिल रेनॉड ने बनविलेले पहिले ऍनिमेशन



                               आज परिस्थिती बदलली आहे. आज चित्रपटांमध्ये प्राणी, माणसे आणि आता अभिनेता सुद्धा संपुर्णपणे आभासी (डिजिटल) एनिमेशन मध्ये बनवले जातात. आज  काही चित्रपट तर संपूर्णपणे कॉम्पुटर जनरेटेड आहेत.  चित्रपटांप्रमाणे विडिओ गेम्स मध्ये आधी 2D आणि आता 3D चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कथा सांगणारे तंत्रज्ञान आता व्हर्चुअल रिऍलिटी मध्ये आले आहेत. कदाचित भविष्यात चित्रपट आपल्या जीवनाचाच एक भाग होतील. एनिमेशन हे भासमान जग जरुर आहे पण त्याचा वापर योग्य माहिती सांगण्यासाठी व्हायला हवा.  तो वापर म्हणजे मानवी विकास. एनिमेशन हे मर्यादित क्षेत्र न राहता आज त्याचा वापर मनोरंजनाव्यतिरिक्त वास्तुशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय शास्त्र शिक्षणक्षेत्र,सामान्य विज्ञान, पर्यावरण, संशोधन, खगोल आणि अंतराळात शास्त्रात होत आहे. आपण आधीही पाहिले की कुठलीही माहिती ही गोष्टीरुपात आणि नंतर चित्ररुपात समजून घेतल्यास मनात चिरकाल टिकते. हाच एनिमेशन चा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे माहितीचे योग्य प्रकारे सादरीकरण. 

पिक्सारने केलेली ३d ऍनिमेशन ची सुरुवात
टॉय स्टोरी (१९९५) 



No comments:

Post a Comment

  “This is such a terrifying experience,”  We can’t imagine the amount of pressure on those scientists who worked tirelessly over the years ...